कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचं महत्व वाढलं, असं काही अंशी जरी वाटत असलं तरी, ऑनलाईन शिक्षणाची लाट येणारच होती. ह्याची जाणीव १० वर्षांपूर्वीच झाली होती. हाय स्पीड इंटरनेट आणि त्याची सहज उपलब्धता यामुळे ऑनलाईन शिक्षण आता अधिक सोपं झालं असलं तरी, अजूनही ऑनलाईन शिक्षणाबद्दल समज गैरसमज आहेत. आणि ऑनलाईन शिक्षण नक्की कसं असायला पाहिजे याबद्दल संभ्रम आहेत. गेल्या आठ दहा वर्षातील ऑनलाईन शिक्षण देण्याच्या आमच्या धडपडीतून आम्हाला काही गोष्टीची जाणीव झाली आणि त्या जाणिवेतूनच ऑनलाईन शिक्षणाचा एक  फॉर्मुला तयार झाला. आणि गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन शिकणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानंतर आमची खात्री झाली कि ऑनलाईन शिक्षणाबद्दलची आमची मते आणि निष्कर्ष योग्य आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा आमचा हा  फॉर्मुला विद्यार्थ्यांना नक्कीच करिअरच्या दिशेने नेणारा आहे. 

ऑनलाईन शिक्षणाबद्दलची आमची मते किंवा निष्कर्ष असे आहेत. 

१. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी योग्य ती साधन सामुग्री असायलाच हवी.

२. विषयानुरूप संपूर्ण कोर्सची रचना आणि शिकविण्याचा क्रम निश्चित असायला हवा. 

३. नुसत्या मोबाईलवर ऑनलाईन शिकवणं आणि शिकणं हे कधीच परिणामकारक होणार नाही. 

४. विद्यार्थी किती शिकला, त्याला किती समजले याचे योग्य ते मोजमाप ऑनलाईन झाले पाहिजे. 

५. नुसते ऑनलाईन लेक्चर देऊन शिक्षण होत नाही. तर त्याला ऑनलाईन प्रॅक्टिकल शिक्षणाची जोड हवी.

६.  विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन ऑनलाईन पण योग्य पद्धतीने झाले पाहिजे. 

७. असाईनमेंट्स किंवा प्रोजेक्ट नियमित ऑनलाईन सबमिट झाले पाहिजेत, आणि शिक्षकांनी ते तपासून योग्य तो रिमार्क दिला पाहिजे. 

८. ऑनलाईन परीक्षा पद्धत अशी असायला हवी कि जिथे विद्यार्थ्याला कॉपी करण्याची संधी  मिळता कामा नये. कारण अपवाद वगळता आजचा विद्यार्थी प्रामाणिक दिसत नाही. 

९. कोर्स कालावधीमध्ये केलेल्या कामाचा ऑनलाईन पोर्टफोलिओ तयार व्हायला हवा. ज्याचा उपयोग त्याला त्याच्या प्रमोशनसाठी आणि नोकरी मिळवण्यासाठीसुद्धा होईल 

१०. कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोकरी / व्यवसायासाठी मार्गदर्शनपर ऑनलाईन पोर्टल असायला हवे, जिथून विद्यार्थ्याला नोकरी / व्यवसायाची संधी मिळेल. 

ऑनलाईन शिक्षणाची अशी आव्हानात्मक रचना करण्यासाठी आमची खूप वर्षे गेली पण शेवटी आम्ही ते पूर्ण केलं. 

ग्राफिक डिझाईनचा हा पाच लेसनचा ऑनलाईन डेमो कोर्स करून पहा, म्हणजे तुमची खात्री होईल, कि आमचा कोणताही कोर्स ऑनलाईन शिकणं किती सोपं असतं. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *