Current Status
Not Enrolled
Price
4999
Get Started
or

ग्राफिक डिझाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सपैकी कोरल ड्रॉ हे एक व्हेक्टर बेस सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबसाठी लागणारे ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी होतो. ज्यामध्ये ड्रॉईंग, कलरिंग आणि इफेक्टस वापरून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स बनविली जातात. खास करून आर्टिस्टसाठी बनविलेलेल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही लोगो डिझाईन, व्हिजिटिंग कार्ड, स्टेशनरी, लिफलेट, फोल्डर, स्टिकर, पोस्टर, जाहिरात, बॅनर, होर्डिंग अशा अनेक प्रकारची प्रिंट डिझाईन्स बनवू शकता. डिझाईनची संकल्पना एकदा फायनल झाली, कि ती संकल्पना प्रत्यक्षात दृश्य रूपात आणण्यासाठी कोरल ड्रॉ ह्या टूलचा उपयोग होतो. ग्राफिक डिझाईन हा खूप मोठा विषय आहे. त्यासाठी विचार करणे, लिहिणे, डिझाईनसाठी कल्पना सुचणे, फोटोग्राफी, फोटो एडिटिंग, प्रिंट आणि वेब टेक्निक्स, ऑनलाईन मार्केटिंग अशा इतर अनेक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. आणि हे सारे स्टेप बाय स्टेप शिकावे लागते. कोरल ड्रॉमध्ये ड्रॉईंग, कलरिंग, इफेक्टस आणि लेआऊट / कॉम्पोझिशनचा प्रॅक्टिकल अभ्यास आहे. कोरल ड्रॉचा हा कोर्स क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट ह्या एक वर्षाच्या पूर्ण कोर्समधील पहिला महत्वाचा टप्पा आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर दुसरा रास्टर ग्राफिक्स फोटोशॉपचा कोर्स करायचा आहे.

ह्या कोर्समध्ये फक्त टूल्स आणि मेनूचा अभ्यास नाही, तर ग्राफिक डिझाईन ज्या पद्धतीने बनते आणि ते  बनविताना ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या साऱ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकलसह साध्या, सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या आहेत. हा कोर्स तुम्ही नियमित प्रॅक्टिकल करून पूर्ण केलात तर तुमची खात्री होईल कि, खरंच, ग्राफिक डिझाईन खूप सोपं आहे.

कोरल ड्रॉचा हा 30 लेसनसह 60 दिवसाचा प्रॅक्टिकल ऑनलाईन कोर्स आहे. 

पुढील लेसन अनुक्रमे दर दोन दिवसांनी उपलब्ध होईल. या दोन दिवसामध्ये तुम्हाला संबंधित लेसनची असाईनमेंट अपलोड करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात ठेवा, असाइनमेंट अपलोड केल्यानंतरच पुढील लेसन ओपन होईल.

Scroll to Top